Ad will apear here
Next
आयुष्यातील समस्यांची उकल शोधणे हाच अध्यात्म मार्ग
योगगुरू किरण पांडे यांचे प्रतिपादन; ‘अवघे हरिमय योगबळे’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
प्रकाशन करताना (डावीकडून) अॅड. सुनीता पागे, बुकगंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये, दास विद्यांकुर तथा प्रल्हाद अवचट, योगगुरू किरण पांडे, लेखक सुधीर काळे, स्वाती काळे.

पुणे :
‘प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेतच. त्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. आपला जन्म कशासाठी झाला असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्याचे उत्तर ‘या समस्या सोडवण्यासाठीच’ असे आहे. समस्या संपल्या की जन्मच संपला. या प्रश्नांची उत्तरे शोधणे किंवा समस्यांची उकल शोधणे हेच खरे अध्यात्म आहे. गहन रूप असलेले अध्यात्म सहज कसे होऊ शकते हे सुधीर काळे यांनी लिहिलेल्या ‘अवघे हरिमय योगबळे’ या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांना वाचायला मिळेल. हे पुस्तक अध्यात्माच्या दिशेने जाणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेलच; पण अध्यात्मात रस नसलेल्या व्यक्तींनी जरी हे पुस्तक वाचले, तरीही त्या गोष्टीतील हिमालयातील प्रवास वाचताना त्या रममाण होतील,’ असा विश्वास योगगुरू किरण पांडे यांनी व्यक्त केला.

सुधीर काळे यांच्या ‘अवघे हरिमय योगबळे’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि ई-बुकचे प्रकाशन रविवारी (२९ डिसेंबर २०१९) पुण्यात वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विद्यानंदांचे अंतरंग शिष्य दास विद्यांकुर तथा प्रल्हाद अवचट उपस्थित होते. या वेळी बुकगंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये, लेखक सुधीर काळे आणि त्यांच्या पत्नी स्वाती काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. योगगुरू किरण पांडे हे पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य आहेत.

योगगुरू पांडे म्हणाले, ‘मी हे पुस्तक दोन दिवसांत वाचले. यामध्ये असलेल्या गोष्टीत प्रत्येक व्यक्ती स्वत:ची व्यक्तिरेखा शोधेल; पण माझे म्हणाल तर मला या गोष्टीतील नायक निरंजनची कथा ही माझीच कथा वाटली. दोघांची परिस्थिती, आलेले काही आध्यात्मिक अनुभव सारखेच आहेत. पुस्तकाच्या शेवटी निरंजनचे मनोगत आहे ते आधी वाचा, मग पुस्तक वाचा, असा सल्ला मी वाचकांना देईन. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगाच्या शेवटच्या ओळी ‘अवघे हरिमय योगबळे’ हेच या पुस्तकाचे नाव आहे हे उत्तम झाले. हे पुस्तक म्हणजे ललित स्वरूपात मांडलेले ओघवते अध्यात्म आहे. त्यामुळे त्याच्या वाचनाने वाचक मनरूपाने सद्गुरूंपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा आहे.’

प्रल्हाद अवचट म्हणाले, ‘सामान्यपणे पुस्तकाचा उपयोग मस्तकापर्यंत असतो. ग्रंथ हा शरीरातील ग्रंथीग्रंथीपर्यंत झिरपतो आणि ‘अवघे हरिमय योगबळे’ याला पुस्तक नव्हे, तर ग्रंथ म्हणायला हवे. हे पुस्तक वाचल्यावर मला संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणावेळच्या अभंगांचीच आठवण झाली. सध्याच्या जीवनात माणसाला खरा धर्म काय आहे हे माहीतच नसते. तो ज्या गोष्टींना धर्म समजतो त्या वेगळ्याच असतात. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, जीवनात निर्माण झालेल्या समस्यांची उकल न सापडल्यामुळे विमनस्क अवस्थेत असलेल्या माणसाने काय करायला हवे याचे संपूर्ण वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे प्रवासवर्णन आहे; पण या प्रवासवर्णनातील लेखकाचे व इतर पात्रांचे अनुभव अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचायलाच हवे.’

बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये म्हणाल्या, ‘ पुस्तकांचा अमूल्य ठेवा सर्वांना उपलब्ध व्हावा, तसेच मुद्रित पुस्तके डिजिटल स्वरूपात यावीत, श्राव्य स्वरूपात यावीत यासाठी बुकगंगा पब्लिकेशन्स अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. साखरप्यातील मुलींना प्रशिक्षित करून त्यांना ई-बुक तयार करण्याचे प्रशिक्षण बुकगंगाने दिले आणि इंटरनेटवर ही पुस्तके सर्वांसाठी उपलब्ध झाली. मराठीतील दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्यासाठी बुकगंगा सतत प्रयत्नशील आहे. बुकगंगाचे संस्थापक मंदार जोगळेकर यांनी ‘अवघे हरिमय योगबळे’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती बुकगंगा पब्लिकेशन्स प्रकाशित करेल असे ठरवले. या पुस्तकाच्या प्रसिद्धीमुळे ‘बुकगंगा’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.’

‘माझ्या पुस्तकाची अवघ्या एका वर्षात दुसरी आवृत्ती काढावी लागते ही समाधानाची बाब आहे. सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे सद्गुरू स्वामी विद्यानंद यांनी माझ्याकडून हे पुस्तक लिहून घेतले. आतापर्यंत केलेली साधना, अभ्यास याचे सार या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी कवी नाही. त्यामुळे पुस्तकात अवतरलेले काव्य ही सद्गुरूंची कृपाच आहे,’ अशा शब्दांत लेखक सुधीर काळे यांनी आपले मत व्यक्त केले.

सुनील थिटे यांनी लेखक काळे यांचा तर सुलभा मेनन यांनी योगगुरू किरण पांडे, दास विद्यांकुर यांचा परिचय करून दिला. पुस्तकाच्या निर्मितीला विविध पद्धतीने हातभार लावणाऱ्या स्वाती काळे, सुलभा मेनन, सुरेश लिमये, सुचेता राशिनकर, मंदाकिनी अवचट, सुनील थिटे, माणिक गोडबोले आणि बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका गौरी बापट यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. अॅड. सुनीता पागे यांनी सूत्रसंचालन केले.


(‘अवघे हरिमय योगबळे’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. ऑडिओ बुक खरेदीसाठी येथे क्लिक करा. या पुस्तकातील काही अंश वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZBLCH
Similar Posts
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
प्रसाद शिरगांवकरांचे लेखन सखोल आणि विचार करायला लावणारे पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ
प्रसाद शिरगांवकरांच्या तीन पुस्तकांचे २९ फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेली, आगळावेगळा वाचनानुभव देणारी तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात प्रकाशित होणार आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे आहेत. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत असून, प्रसिद्ध लेखक, आयटी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language